
गडचिरोली/चामोर्शी:
चामोर्शी शहरातील एका सात वर्षीय चिमुरडीवर शहरातील २७ वर्षीय प्रज्वल सदाशिव भांडेकर नामक युवकाने लैंगिक अत्याचार केल्याची किळसवाणी व माणुसकीला काळीमा फासणारी घटना दि.८ जुन रोजी घडली. यापूर्वी या युवकावर 2019 मध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. सदर आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका वार्डातील फिर्यादीच्या घराच्या स्लॅब वर पेंटिंग चे काम सुरू असताना पेंटिंग करणाऱ्या युवकाने खेळत असलेल्या फिर्यादीच्या मुलीस बाजूला नेऊन लैंगिक अत्याचार केला याबाबत पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी कलम २८०/२०२६ कलम ६४(१),६५(२) बी एन एस 2023 सह कलम लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६ अन्वये गुन्हा नोंद केलाव आरोपीस अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले व सहाय्यक फौजदार रामदास कोडापे हे करीत आहेत.


