
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली,दि.७ जुन:
“मानवतेचा, शांततेचा आणि समतेचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धांच्या विचारांची आज देशाला अधिक आवश्यकता आहे. देशाला युद्धाची नाही, तर बुद्धाची गरज आहे.”असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ गटनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी केले.
पंचशील बौद्ध समाज मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळ, कीष्टापूर टोला येनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंचशील बुद्ध विहार लोकार्पण व भगवान गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आ.विजय वडेट्टीवार उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता व सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रसार घराघरात होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. राम मेश्राम, प्रदेश सचिव अजय कंकडालवार, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष निकेश गद्देवार, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, माजी प्राचार्य जयंत येलमुले गोंगले सर, निनाद देठेकर, प्रमोद उमरे अध्यक्ष, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रेमानंद गोंगले, राकेश कुरखेडे सचिव, भीमराव रामटेके उपाध्यक्ष तसेच परिसरातील बौद्ध बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

