
काटोल प्रतिनिधी
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माननीय श्री रविंद्रजी मनोहरे साहेब जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय आमदार श्री चरणसिंगजी ठाकूर, दिनेशजी ठाकरे, अध्यक्ष काटोल तालुका ऍग्रो डीलर असोसिएशन, प्रवीणजी लोहे उपाध्यक्ष काटोल तालुका ऍग्रो डीलर असोसिएशन,तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री बळीराम सातपुते उपविभागीय कृषी अधिकारी काटोल आणि प्रमुख अतिथी म्हणून अश्विनी सहारे तालुका कृषी अधिकारी काटोल उपस्थित होते.
कार्यक्रमाला काटोल तालुक्यातील ऍग्रो डीलर ची संपूर्ण टीम तसेच काटोल ग्रामीण मधले जवळजवळ शंभर कृषी सेवा केंद्र धारक विक्रेता बंधू उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने अध्यक्ष भाषणात माननीय मनोहरे साहेबांनी ज्या ज्या समस्या कृषी सेवा धारकांना येत आहे त्यांचा डिजिटल पोर्टलचा असेल किंवा लायसन संबंधी असेल गोडाऊन लिंकिंगच्या संबंधित असेल खताचे युरिया डीएपी आणि मिश्र खताचे नियोजन करण्यासाठी माननीय कलेक्टर साहेबांसोबत चर्चा करून त्या ठिकाणी ठेवावे अशी सूचना मांडली संपूर्ण डीलर ऍग्रो च्या वतीने माननीय कृषी जिल्हा कृषी अधिकारी साहेबांचा सांगण्यात आलं की आम्ही कृषी सेवा विक्रेते नियमित शेतकऱ्यांच्या सोबत राहतो. शेतकरी आमच्या सोबत असल्यामुळे आम्ही सुद्धा त्याचे कोणीतरी आहो हे पाहूनच आम्ही काम करतो म्हणून आमच्या शेतकऱ्यांचा संबंध आणि आमच्यावर असणाऱ्या कृषी विभागाचा त्रास फोडा कमी व्हावा अशी सगळ्या माध्यमातून विनंती करण्यात आली.

कार्यक्रमाला माननीय मनोहरे साहेबांनी सुंदर मार्गदर्शन केले तसेच तालुकाध्यक्ष दिनेशजी ठाकरे यांनी सखोल मार्गदर्शन केले व आपल्या डीलर बंधूंच्या असणाऱ्या काही समस्या लक्षात घेता कृषी विक्रेता बंधूंना यापुढे संघटित राहून जो विक्रेता व्यवसाय आपण करतो त्यासाठी एकरूप राहण्याची विनंती केली मोठ्या संख्येने डीलर बंधू उपस्थित होते आणि येणाऱ्या सिजन च्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन शेतकऱ्यांच्या जीवनात भरभराटी येऊन आपला व्यवसाय चांगला होवो याकरता शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला तालुका सचिव आशिषजी शेंडे, गणेशजी चरडे, मनोजजी डोईजोड, दिनेशजी नासरे, सागरजी पुंड, शंकरभाऊ धवड, योगेशजी टावरी, नंदकिशोरजी खरबडे, विजयजी डोंगरे, चेतनजी बोधाळे, चांडक साहेब आणि सगळे काटोल व कोंढाली व सर्व ग्रामीण ऍग्रो डीलर चे सदस्य संचालक उपस्थित होते.
#newsjagar #MLA CHARANSINGH THAKUR

