
ठिय्या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-महेंद्र ब्राह्मणवाडे
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली,दि. ३ जून:
शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात ४ जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने या आंदोलन करण्यात येत आहे.

गडचिरोली तालुक्यातील हिरापूर ,गुरुवळा ,राखी आणि शिरपूर चौक येथे प्रस्तावित विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसीकरिता भेंडाळा परिसरातील 14 गावांनी शेतजमिनी देण्यास नकार दिला आहे. तसेच या मोशी तालुक्यातील जयरामपूर परिसरातील १३ गावांच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात शासनाने आदेश दिला आहे. या धोरणाच्या निषेधार्थ व अन्य मागण्यांना घेऊन या आंदोलन करण्यात येत आहे.
या आंदोलनात शेतकरी, नागरिक, विविध पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक संघटना व पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

