
सोनू वाळके,जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली.
चामोर्शी ते हरणघाट रस्त्याकडे जिल्ह्यातील खासदार व आमदारांचे पण दुर्लक्ष्य.
निवेदन देऊनसुद्धा गडचिरोली प्रशासन झोपेत.

प्रशासनाला नागरिकांचा जीव कवडीमोलाचा
जिल्याचे प्रतिनिधित्व करणारे खासदार आणि आमदार सुद्धा झोपेत.
चामोर्शी हरणघाट रस्त्यासाठी आंदोलनाचे इशारे
चामोर्शी :– चामोर्शी ते हरणघाट ते चामोर्शी ,चंद्रपूर, नागपूर तसेच इतरत्र कुठेही जाण्यासाठी वाहनधारकांना जवळचा आहे. मात्र हा रस्ता गेल्या काही वर्षांपासून खड्डेमय झाला आहे. त्यासाठी या रस्त्याची नव्याने बांधणी करावी म्हणून शासनाकडे सतत मागणी केली जात होती. त्याची दखल घेत शासनाने रस्ता बांधकामाची मान्यता दिली आहे. आणि या एकूण 15 किमी च्या रस्त्यापैकी सात ते आठ किमी चा रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले. पण सूरजागढ प्रकल्पाच्या अतिजड वाहनाने या रस्त्याचे काही महिन्यातच तीनतेरा वाजले.रोज शेकडो अतिजड वाहने या रस्त्याने जात असल्याने हा संपूर्ण रस्ता फुटून गेला आहॆ.मागील वर्षी बांधलेल्या रस्त्यांची काही दिवसांपूर्वी डागडुजी करण्यात आली पण ही डागडुजी करतांना सपाट न करता चढखाल स्वरूपात झाली आहॆ.गेल्या महिन्यात हरणघाट नाका ते दोठकुली पुलापर्यंत कामं सुरू केलं होतं, प्रवाश्यांना वाटलं होतं की एवढा तरी रस्ता व्यवस्थित होईल पण या एक किलोमीटर च्या रस्त्यावर माती टाकून मोठी गिट्टी पसरविण्यात आली व त्याच्या वर रोडरोलर फिरवून कामं बंद करण्यात आल. तेव्हापासून ते आतापर्यंत या रस्त्याची माती पूर्ण उखलुन मोठी गिट्टी बाहर निघाली
— चामोर्शी ते हरणघाट मार्गावर पडले मोठे मोठे भगदाड
नागपूर , चंद्रपूर , अहेरी, सिरोंचा आदी ठिकाणी जाण्यासाठी हा मार्ग अतिमहत्त्वाचा आहे. पण या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे असल्याने संपूर्ण रस्ता खड्ड्याने व्यापला आहॆ.त्यामुळे हे रस्ते प्रवाश्यांना गचके देत असतात.बरेचदा या रस्त्यावर किरकोळ अपघात सुध्दा झाला आहॆ. पावसाळ्यामध्ये चिखलाचा त्रास तर उन्हाळ्यामध्ये धुळीचा त्रास ,अनेकांना कमरेचे आजार , मणक्याचे आजार सुध्दा या रस्त्यामुळे झालेले आहे. बॉक्स )—— रस्त्यावरून जात असतांना प्रवाश्यांच्या मनात वाटत असते कभी खुशी कभी गम.चामोर्शी मूल मार्गावरून जात असतांना.सुरवातीला चामोर्शी ते फोकुर्डी पर्यंत रस्ता पूर्ण पणे खराब झाला आहॆ त्यावेळी प्रवासी गचके खात कसे बसे फोकुर्डी पर्यंत येत असतात.त्यानंतर फोकुर्डी ते वाघोली बसस्टॉप पर्यंत डागडुजी केलेला रस्ता आहॆ पण तोही रस्ता सपाट नसून चढ खाल आहॆ त्यामुळे प्रवाश्यांना थोडा उसंत या रस्त्यावर मिळतो त्यानंतर वाघोली बसस्टॉप ते दोठकुली पर्यंत रस्ता खड्डेयुक्त असून या रस्त्यावरून वाहन नेत असतांना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन आपलं वाहन चालवाव लागते,तसेच दोठकुली बसस्टॉप ते दोठकुली नाला पर्यंत रस्ता थोडा व्यवस्थित आहॆ त्यामुळे प्रवाशांना या रस्त्यावर आल्यावर थोडं बरं वाटते, परत आणखी नाल्या पासून नदी पर्यंत गचके देणारा रस्ता आहॆ. वाहनधारकांना आपलं वाहन काढण्यासाठी दमछाक होतं असते. त्यामुळे एकंदरच या रस्त्याचे विवरण करायचे झाल्यास हिंदी चित्रपटातील कभी खुशी कभी गम या चित्रपटाच्या शीर्षकाची आठवण प्रवाश्यांच्या मनात नक्की येत असेल.
चामोर्शी ते हरणघाट रस्त्याकडे जिल्ह्यातील खासदार व आमदारांचे पण दुर्लक्ष्य.
पावसाच्या पाण्यामुळे खड्यात पाणी साचल्याने प्रवाश्यांना कार,बाईक न्यायचा अंदाज येत नसून परिणामी दुर्घटनेचे प्रमाण दिवसेन दिवस वाढत आहे,तरी प्रवासी जीव धोक्यात टाकून नाईलाजाने या रस्त्याने प्रवास करीत आहे ,तरी जिल्हा प्रशासन अजिबात लक्ष्य देत नाही आहे तसेच जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे खाजदार व आमदार यांनी सुद्धा ढुंकून बघितले नाही, फक्त निवडणुकीच्या काळात दारापर्यंत येऊन मतासाठी हात जोडले आता त्यांचा चेहरा सुद्धा गावात दिसत नाही,अशे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
या खड्डेमय प्रवास करण्यापेक्षा लोक जादा अंतर कापून चंद्रपूर ,नागपूर,साठी आष्टी तसेच गडचिरोली मार्गाने ये जा करीत आहेत,तात्पुरता उपयोजना म्हणून प्रशासनाने हे खड्डे बुजवायला पाहिजे होते परंतु लोकांचे जीव हे प्रशासनाला स्वस्त वाटत आहे म्हणुन याकडे कानाडोळा करत आहे,अशे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरिक यांचे लक्ष्य लागले आहे की चामोर्शी ते हरणघाट रस्त्यासाठी प्रशासन काय पाऊल उचलतील.अन्यथा आंदोलन करू अशे इशारे देण्यात आले.
NEWS JAGAR (आवाज सत्याचा)

