
गडचिरोली येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या सुसज्ज रुग्णालय ईमारत बांधकामासाठी 471.41 कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेला राज्य सरकारची मंजुरी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे मानले विशेष आभार
गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यविषयक सुविधा मिळाव्या यासाठी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आपल्या कार्यकाळात गडचिरोली येथे सुसज्ज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर व्हावे यासाठी विधानसभेत व शासनदरबारी आग्रहपूर्वक मागणी केली. प्रसंगी यासाठी आंदोलन केले त्याचाच परिणाम म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गडचिरोली येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर करण्यात आले मात्र स्वतः ते वैद्यकिय क्षेत्रातील असल्याने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ने जिल्ह्यांतील गोरगरीब नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा देण्याला मर्यादा येणार यांची त्यांना जाणीव होती म्हणूनच शासकीय वैद्यकिय महविद्यालय मंजुर व्हावे या मागणीवर ते ठाम होते. अखेर त्यांच्या आग्रही मागणीपुढे नमते घेत ना. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात गडचिरोली येथे शासकिय वैद्यकिय महाविद्यालय मंजूर करण्यात आले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या जागेचा व निधीचा विषय तांत्रीक कारणामुळे प्रलंबित असल्यामुळे त्यावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी त्यांनी राज्य सरकारकडे मागणी लावून धरली होती.27 जुलै रोजी त्यांनी नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुसज्ज अशा रुग्णालय ईमारत बांधकामासाठी 471.41 कोटी रूपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरी देण्यात यावी व महाविद्यालयाच्या जागेसंबंधी व अध्यापकापासून परिचारिकेपर्यंत विविध रिक्त पदांना मंजूरी देण्यासंबंधीचे विषय लावुन धरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्यातील प्रश्न आस्थेने सोडविण्यासाठी नेहमी पुढाकार घेत जिल्ह्यांतील विविध विकासकामांना आतापर्यंत मंजूरी दिली. त्यामुळे जिल्ह्यांतील नागरिकांना दर्जेदार आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध व्हाव्या व जिल्ह्यांतील कोणताही नागरिक उपचारापासुन वंचित राहू नये यासाठी माजी आमदार डॉ देवराव होळी यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ 471.41 कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेला मंजूरी दिली. व जिल्हयाच्या आरोग्य सेवेच्या विकासात मैलाचे दगड ठरणारा निर्णय घेतला व ईतर प्रलंबीत प्रश्न तातडीने सोडविण्यात येतील असे आश्वासीत केले.
यामुळे भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी गडचिरोली जिल्हयातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचे जे स्वप्न बघितले होते व यासाठी जे पाठपुरावा व प्रयत्न केले ते आता सत्यात साकारणार आहे. माजी आमदार डॉ देवराव होळी यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबीत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. मात्र डॉ. होळी यांनी या प्रश्नाकडे लक्ष घालत सातत्यपूर्ण मागणी सुरूच ठेवली व त्यांच्या मागणीला अखेर यश आले या बद्दल त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे आभार मानले.

