
सोनू वाळके प्रतिनिधी
चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील एका संवेदनशील प्रकरणात पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) च्या नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत पोलिस यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत. १० वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अजूनही फरार असल्याचा दावा करत पक्षाच्या नेत्यांनी पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. याशिवाय आरोपीच्या कुटुंबाकडून धमक्या आणि राजकीय दबावामुळे आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जर आरोपीला दोन दिवसांत अटक केली नाही तर एसपी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, २९ जून २०२५ रोजी पीडित मुलगी आणि

तिचे वडील वेबळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले. तथापि, तेथील पोलिस सुनील कुलमेथे आणि गायकवाड यांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला. ‘तक्रार लिहिण्यासाठी आमच्याकडे लेखक नाही, आरोपीना अटक करण्यासाठी आमच्याकडे महिला कॉन्स्टेबल नाही आणि आम्ही आरोपींना अटक करू शकत नाहीं’ अशी विचित्र कारणे देऊन तक्रार दाखल करण्यात आली नाही, असा दावा पक्षाने केला. “या पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही आणि आरोपी पळून जाण्यास ते जबाबदार आहेत,” असे पक्षाने म्हटले आणि दोन्ही पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली, पक्षाच्या नेत्यांनी पुढे म्हटले की, मूल पोलिस ठाण्यात या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, तरीही ५१ दिवसांनंतरही आरोपींवर कोणतीही कारवाई झालेली नाही. “एसपी साहेब चंद्रपूर यांनी योग्य ती कारवाई करावी.”
नोंदवून त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. ३० जून २०२५ रोजी आरोपी निशिगंध (उर्फ चिंदू उर्फ महाराज जपान उराडे) Nishigand Japan Urade याच्याविरुद्ध मूल पोलिस ठाण्यात एफआयआर क्रमांक ०२३४ अंतर्गत कलम १७३ बीएनएसएस अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली. परंतु, तेव्हापासून आरोपी फरार आहे. आरोपी कुठे लपला आहे हे त्याच्या संपूर्ण कुटुंबाला माहिती आहे, तरीही पोलिसांनी कुटुंबाची योग्य चौकशी केली नाही, असा आरोप पक्षाने केला आहे. पत्रकार परिषदेत अधिक गंभीर खुलासे करण्यात आले. आरोपीचा मोठा भाऊ मदन जपान उराडे आणि प्रशांत बाबुराव आडे यांनी पीडितेच्या कुटुंबाला ‘केस परत घ्या, अन्यथा आम्ही तुम्हाला बर्बाद करू आणि तुमची बदनामी करू असे म्हणत धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. दोघांनीही आरोपींना पाठिंबा दिला आहे, त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करावी. News Jagar
पक्षाने अशी मागणी केली. याशिवाय, आरोपीचा मोठा भाऊ कॉंग्रेसचा कार्यकर्ता असल्याने राजकीय दबाव आणून आरोपींना वाच्वण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप आहे. आरोपीने यापूर्वी अनेक गुन्हे केले आहेत आणि पोलिस यंत्रणेला मॅनेज केले आहे, असा थेट आरोप पक्षाकडून करण्यात आला. विशेष म्हणजे, आरोपीने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, जो फेटाळण्यात आला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील करण्यात आले आहे. याचा अर्थ आरोपी कुटुंबाच्या संपर्कात आहे आणि फरार नाही, असा पक्षाचा दावा आहे. १ ऑगस्ट २०२५ रोजी चंद्रपूरच्या एसपी कार्यालयात निवेदन सादर करून ४८ तासांची मुदत देण्यात आली होती. परंतु, २० दिवस उलटूनही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. संवेदनशील प्रकरण असूनही
एसपी साहेबांनी कोणतीही कारवाई केली नाही अशी टीका पक्षाने केली आहे. पीडित मुलगी फक्त १० वर्षांची आहे आणि तिला शाळेत जायलाही भीतं वाटते, तिची मानसिक स्थिती बिघडली आहे आणि ती भीतीच्या सावटाखाली उभी आहे. आम्हाला न्याय द्या, असे भावनिक आवाहन पक्षाच्या नेत्यांनी केले. पक्षाच्या नेत्यांनी इशारा दिला की, “जर दोन दिवसांत आरोपीला अटुक केली नाही तर आम्ही चंद्रपूरच्या एसपी कार्यालयासमोर उपोषण करू. पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) च्या नामा वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि राजकीय हस्तक्षेपाच्या आरोपांमुळे जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

