
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली/देसाईगंज, दि. ३१ मे :
काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी तसेच काँग्रेसच्या विविध विभाग व सेल यांच्या वतीने हुतात्मा स्मारक, देसाईगंज येथे विविध जनहिताच्या मागण्यांसाठी भव्य निदर्शन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांची प्रमुख उपस्थिती होती.
इंधन दरवाढ व टंचाई दूर करणे, शेतकऱ्यांच्या धान-मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करून प्रलंबित चुकारे देणे तसेच नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी जिवन पाटील नाट, परसरामजी टिकले, राजेंद्र बुल्ले, मिलिंद खोब्रागडे, प्रभाकरजी तुलावी, जयंत हरडे, नितीन राऊत, गिरीधर तितराम, दिलीप घोडाम, इलियास पठाण, प्रकाश समर्थ, गजानन सेलोटे, कैलास राणे, अरुण कुंभरवार, नरेंद्र गजपुरे, संजय करांनकर, नेताजी ठाकरे, डोमा दिवठे, गुलाब नंदेश्वर, रमाकांत भर्रे, अमर भर्रे, प्रांजल धाबेकर, सागर वाढई, कैलास वानखेडे, मनोहर खेकारे, कमलेश बारस्कर, सागर बन्सोड, होमराज हारगुडे, हंसराज लांडगे, हिरामण कुळमेथे, प्रकाश सांगोडे, मेघराज बुराडे, परशुराम ठाकरे, प्रमोद पत्रे, भूमेश्वर शिंगाडे, शैलेंद्र बगमारे, ऋषी बगमारे, व्यंकट पेंदाम, श्रीराम सोरते, महेंद्र खरकाटे, गजेंद्र नाईक, यशवंत जुमनाके, भावेश मुंगणकर, प्रशांत अंकमवार, मुन्ना शेख, कैलास बगमारे, जुबेर शेख, आक्रोश शेंडे, पवन गेडाम, पंकज चांहादे, मुजीब शेख, जगन पर्वते, राकेश निमकर, नेताजी बुराडे, श्रीहरी कन्नाके, सागर शेंडे, उमाकांत भर्रे, तेजराम नंदेश्वर, श्रीहरी ठाकरे, दिलीप कुळमेथे, हरिदास बगमारे, कैलास बगमारे, राजकुमार मेश्राम, शरीफ भाई, सुनील बुराडे, रियाजुल शेख, अजीम खान, जब्बार शेख, सादिक शेख, डोमाजी दिवटे, हाजरा शेख, मुजीब शेख, राणी शेख गंधर्व मेश्राम, बंडू तांबे, अश्विन मुळे, देवानंद सहारे, आर. एम. राऊत, अर्पणा राऊत, जयमाला पेंदाम, मंदा समर्थ, वैष्णवी आकरे, आशा झोडे, शालू नंदेश्वर, सुनीता चौधरी, सीमा टेंभुर्णे, सुशीला गजभिये, हाजरा शेख, सुरेखा ढोरे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

