
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली,दि.३१ मे:
आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव ते शिवणी मार्गावरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाबाबत ग्रामस्थांनी काही तक्रारी केल्यानंतर आमदार रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन पुलाची पाहणी केली.
यावेळी संबंधित बांधकाम कंपनीचे इंजिनिअर उपस्थित होते. आमदार मसराम यांनी पुलाच्या कामाची सविस्तर माहिती घेत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच कामामध्ये आढळून आलेल्या त्रुटी तात्काळ दुरुस्त करून आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित इंजिनिअर दिल्या.

ग्रामस्थांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पुलाचे काम दर्जेदार व टिकाऊ पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासन व संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश आमदार रामदासजी मसराम यांनी यावेळी दिले.
त्या प्रसंगी उपस्थित काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे,धनपाल मिसार, कमलेश बारस्कर, राहुल पाटील,वैभव धोटे,नीलकंठ बगमारे, सोमाजी ढोरे, नेताजी ढोरे, वामन राऊत, प्रकाश चौधरी, राजेंद्र कुत्तरमारे, देवराव लिंगायत, भास्कर खरकाटे, हरिचंद्र राऊत, वामन राऊत उपस्थित होते.

