
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली दि.३१ मे :
पेट्रोल व डिझेलच्या सतत वाढत असलेल्या दरांविरोधात चामोर्शी तालुका काँग्रेस ,एन.एस यू.आय.व युवक काँग्रेसच्यावतीने शहरातील पेट्रोल पंपावर निषेध आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान “बहुत हो गई महंगाई की मार, हद्दपार करो मोदी सरकार” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यावेळी एनएसयुआय व युवक काँग्रेस यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत वाढती महागाई ही सर्वसामान्य जनतेसाठी मोठे संकट ठरत असल्याचे सांगितले. पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक कठीण बनले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.
शेतकरी वर्गालाही डिझेल दरवाढीचा मोठा फटका बसत असून शेती मशागतीचा खर्च वाढला आहे. अनेक ठिकाणी इंधन पुरवठ्याच्या समस्या निर्माण झाल्याने नागरिक व शेतकरी अडचणीत आले आहेत. केंद्र सरकारने तात्काळ पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात एनएसयूआय जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे,काँग्रेस पर्यावरण जिल्हा अध्यक्ष राजेश ठाकुर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रेमानंद गोंगले, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष विजय लाड,माजी तालुकाध्यक्ष विनोद खोबे,युवक काँग्रेस शहर अध्यक्ष विलास चिचघरे , काँग्रेस आदिवासी तालुकाध्यक्ष पिपलदास सोयाम, ओबीसी तालुका अध्यक्ष सुभाष कोठारे,उपाध्यक्ष हेमंत कोवासे,एनएसयुआय जिल्हा उपाध्यक्ष तेजस कोंडेकर, , कालिदास बुरांडे, सोनू वाळके, आशिष घेर,संजय बुरांडे,ओमप्रकाश चौधरी अभिषेक वाळके,अमन लाकडे, प्रफुल बारसागडे,यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

