
नितेश गट्टीवार गडचिरोली/चंद्रपूर दि.२२ मे :
चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि जंगल व्याप्त भागात चंदू पत्त्याचा हंगाम सुरू होताच हिंदू पत्ता संकलन करण्यासाठी ग्रामीण भागातील गावकरी जंगलात जातात. वाघाच्या कॅरीडॉर मध्ये मेंदू पत्त्याची झाडे असल्याने आपला जीव मुठीत घेऊन जंगलात जातात. मागील वर्षी चंदू पत्ता हंगामात वाघाच्या हल्ल्यात वाढ झाल्याने वन विभागाने जंगलात जाऊ नये असे निर्देश नागरिकांना दिले होते. मात्र वनविभागाचे निर्देशाचे पालन न करता पहाटे नागरिक जंगलात जाऊन तेंदूपत्ता संकलन करीत आहेत. तसेच सिंदेवाही गुंजेवाही भागातुन अत्यंत धक्कादायक व मन हे लावून टाकणारी घटना समोर आली आहे. सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात आज सकाळी ८ वाजताच्या दरम्यान वाघिणीच्या हल्ल्यात चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मौजा गुंजेवाई येथील चार महिला रोजच्या प्रमाणे आज सकाळी चेंडू पत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या मात्र जंगलात दबा धरून बसलेल्या वाघिणीने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की महिलांना स्वतःचा बचाव करण्यासाठी संधीही मिळाली नाही. घटनास्थळीच चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित परिसर हा कक्ष क्रमांक 1836, बीट गुंजेवाही अंतर्गत येतो या भागात मागील काही दिवसांपासून एका वाघिणीचा आपल्या चार पिल्लांसह वावर असल्याचे निदर्शनास आले होते. सकाळी आठ वाजण्याच्या आधी ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पिल्लांसोबत असलेल्या वाघिणी अधिक आक्रमक होतात त्यामुळेच हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या दुर्दैवी घटनेत मृत्यमुखी पडलेल्या महिलांची नावे संगीता संतोष चौधरी वय 35 वर्ष, कवडाबाई दादाजी मोहुर्ले वय 42 वर्ष, अनुबाई दादाजी मोहुर्ले वय 45 वर्ष, सुनिता कौशिक मोहरले वय 35 वर्ष अशी आहेत. घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली असून नागरिकांना जंगलात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चार निरपराध महिलांचाअशा दुदैवी घटनेत मृत्यू झाल्याने परिसरात हाड हाड व्यक्त केल्या जात आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर डोंगर कोसळला असून त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी नागरिकांकडून मागणी होत आह.

