
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
चामोर्शी, दि. ९ जुलै : रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व बूथप्रमुख व पदाधिकाऱ्यांचे BLA-2 (बूथ लेव्हल एजंट-2) आणि विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) संदर्भातील प्रशिक्षण वर्ग गोविंदपूर येथील हॉटेल व्हिला अर्बन सभागृहात उत्साहात पार पडला.
प्रशिक्षण वर्गात भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, ज्येष्ठ नेते भारत खटी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास पाटील भांडेकर, युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री आकाश सातपुते, मोरेश्वर भांडेकर, घोट मंडळ अध्यक्ष राकेश सरकार तसेच गडचिरोली विधानसभा SIR प्रमुख हरीश माकडे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी मार्गदर्शकांनी SIR अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात (३० जून ते २८ जुलै) प्रत्येक मतदान केंद्रासाठी BLA-2 नियुक्त करणे, संबंधित BLO यांच्या समन्वयाने मतदार नोंदणी अर्जांचे वितरण व भरून घेण्याची प्रक्रिया प्रभावीपणे राबविणे, पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी सुनिश्चित करणे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे ऑनलाइन प्रशिक्षण वेळेत पूर्ण करण्याबाबत सविस्तर सूचना दिल्या.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी सर्व बूथप्रमुख व पदाधिकाऱ्यांना BLA-2 आणि SIR अभियानातील प्रत्येक जबाबदारी वेळेत व प्रभावीपणे पूर्ण करून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला क्षेत्र प्रमुख विनोद किरमे, पलाश घरामी, राजू सातपुते, संदीप भोवरे, सुमेन विश्वास, सोम वैद्य, तारक हलदार, महेश विश्वास यांच्यासह रेगडी-हडदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व बूथप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

