
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली/चामोर्शी दि.२१ मे:
भेंडाळा परिसरातील १४ गावातील शेतजमिनी अधिग्रहणप्रक्रिये विरोधातील शेतकऱ्यांच्या संघर्ष अधिक तीव्र झाला असून शासनाने काढलेल्या खरेदी विक्री बंदी अधीसूचनेच्या विरोधात शेतकरी बचाव जनआंदोलन समिती च्या वतीने आज दि.२१ मे रोजी हजारो शेतकऱ्यांचा विराट मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला.
शेतकऱ्यांचा मोर्चा साधूबाबा कुटी ते लक्ष्मी गेट पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत पोहचला. रखरखत्या उन्हातही शेतकऱ्यांचा तीव्र रोष दिसून येत होता. शेतकरी बचाव जनांदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना मोर्चाचे निवेदन दिले.या मोर्चाला विविध राजकीय पक्षांनी व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला. मोर्चात विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संबोधित केले.

या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माकपचे कॉ. अमोल मारकवार, नगरसेवक अमोल गण्यारपवार, काँग्रेस सोशल मीडिया तालुकाप्रमुख विजय लाड,शेतकरी बचाव जन आंदोलन समितीचे प्रमुख मनोज पोरटे ,भुवनेश्वर चौधरी, सुधीर शिवणकर संजय खेडेकर, नामदेव किनेकर, प्रवीण धोटे ,नरेंद्र जुवारे , भक्तदास भगत, अभिजीत सातपुते, यांचे सह हजारो शेतकरी व महिला भगिनी उपस्थित होते.

