
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली दि.२२ मे:
गडचिरोलीहून उमरखेडकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस गुरुवारी सकाळी नवेगाव – मुरखळा गावाजवळ भीषण अपघातग्रस्त झाली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने दोन पलट्या घेत रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना घडली. या दुर्दैवी अपघातात एका पुरुषासह एक महिला व एका लहान बाळाचा मृत्यू झाला असून ३३ प्रवासी जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गंभीर जखमींपैकी काहींना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच खासदार डॉ. नामदेव किरसान व महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच डॉक्टरांकडून उपचारांबाबत सविस्तर माहिती घेतली.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्याशी चर्चा करून गंभीर जखमींवर तातडीने उपचार व आवश्यक शस्त्रक्रिया करण्याच्या सूचना खासदार डॉ. किरसान यांनी दिले.
यावेळी नगरसेवक सतीश विधाते, उपसरपंच दिवाकर निसार, सरपंच सोरटे साहेब, नदीम नाथानी, दिलीप घोडाम, स्वप्निल ताडाम सह उपस्थित होते.

