
नितेश गट्टीवार गडचिरोली/चामोर्शी दि.२७ एप्रिल:
शैक्षणिक सत्र 2025–26 मध्ये घेण्यात आलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एकूण 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 3 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे सत्कार करून गौरव करण्यात आला.
इयत्ता आठवीच्या 33 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी इंद्रजीत अशोक चौधरी, उर्वशी पूर्णानंद व्याहाडकर आणि वैष्णवी जानकीराम राऊत हे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना त्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य डॉ. ए. आर. गौरकार, पर्यवेक्षक एस. भर्रे, व्ही. एन. सालेकर, तसेच शाळेतील सर्व शिक्षक व पालकांना दिले.
शाळेच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

