
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.२६ एप्रिल:
सुधारित राष्ट्रीय निवृत्त वेतन योजनेची अंमलबजावणी करावी, विस्तृत अधिसूचना जारी करावी तसेच इतर प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत संप आंदोलन छेडण्यात आले होते.
या आंदोलनाला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांबाबत शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच सर्वसामान्य जनतेच्या सोयीसुविधेचा विचार करून कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर संप मागे घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी राज्य सहकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी चडगूलवार, नगरसेवक तथा शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीश विधाते, भास्कर मेश्राम, आनंद गडप्पा, सिद्धार्थ मेश्राम, विजय पत्रे, राजेंद्र कोडापे, सुधाकर बावणे, लांजेवार भाऊ, नांदगाये ताई, ज्योतीताई तायडे, नितीन मेश्राम, प्रणालीताई दरडे, जावेद खान तसेच संघटनेचे पदाधिकारी व शेकडो कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

