
RTE आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया पार करताना पारदर्शक पद्धतीने लागलेल्या यादीनुसार आरटीई अंतर्गत ची संपूर्ण नियमबाह्य चौकशी करून आरटीई योजने चा फायदा घेण्यासाठी खोट्या कागदपत्रावर प्रवेश घेतलेल्या त्या पालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे याकरिता आज माननीय शिक्षणाधिकारी साहेब व तालुका गट शिक्षणाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थित सामाजिक युवा कार्यकर्ता तथा सर्व पालक एकजुटीने उपस्थित होते येत्या पंधरा दिवसात सर्व मौका पंचनामा करून कागदपत्राची पडताळणी करूनच आरटीई अंतर्गत प्रवेश द्यावा अन्यथा जिल्हा परिषद समोर उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात सामाजिक कार्यकर्ते रुपेशकुमार वल्के यांनी दिला आहे/

