
नितेश गट्टीवार गडचिरोली/आरमोरी दि.६ एप्रिल:
१ एप्रिल रोजी अंतरगाव ३३/११ के.व्ही. उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
ट्रान्सफॉर्मर जळाल्याची माहिती मिळताच आ.रामदास मसराम यांनी तात्काळ भेट देऊन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी च्या अधिकाऱ्यांना दोन-तीन दिवसांत ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले.

यावेळी स्थानिक शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

