
बुलढाणा – गावक-यांच्या हक्कासाठी लढताना बुलढाण्यातला एका समाजसेवकाला आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागल्याचा प्रकार समोर आला आहे. बुलढाण्यातील विनोद पवार हे प्रशासनाची दिरंगाई आणि उदासीनतेचा बळी ठरलेत, स्वातंत्र्य दिनालाच ही घटना घडल्यानं गावक-यांवर दुखाचा डोंगर कोसळला. हा आक्रोश आहे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नाहक बळी गेलेल्या समाजसमेवकांच्या कुटुंबाचा. बुलढाणा जिल्ह्यातील आडोळ खुर्द गावातले तरुण समाजसेवक विनोद पाटील यांनी गावक-यांच्या मुलभूत हक्कांसाठी अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्यांसाठी १५ ऑगस्टला जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला. गावकरी रस्ते, पाणी आणि घरांसाठीच्या मूलभूत प्रश्नांसाठी जिगाव प्रकल्पाजवळ जलसमाधी आंदोलनात विनोद पाटील आघाडीवर होते.
पोहता येत नाही हे निवेदनात त्यांनी तसं नमूदही केलंल. पण प्रशासनानं हा इशारा गंभीर घेतला नाही, विनोद पवार यांनी जलसमाधी आंदोलनादरम्यान पूर्णा नदीत उडी घेतली, आणि ते नदीत वाहून गेले. एनडीआरएफच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली, पण तब्बल ३० तासांनंतर ,१६ ऑगस्टला विनोद पवार Vinod Pawar यांचा मृतदेह मलकापूर जवळ सापडला.
विनोद पाटील वाहून जात असताना, प्रशासनाकडे त्यांना वाचवण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नव्हती, असा आरोप विनोद पवारांच्या मुलींनी केला. स्वातंत्र्यदिनीच घडलेल्या या घटनेनं गाव हळहळलाय. गावाच्या हक्कासाठी लढणा-या विनोद पवारांच्या कुटुंबावर आणि गावावर दुखाचा डोंगर कोसळला. पण प्रशासनाच्या ढीम्मपणामुळे , दुर्लक्षामुळे अजून किती सामान्य माणसांचे बळी जाणार हा मोठा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. News Jagar

