
चामोर्शी परीसरातील मुस्लिम समाज बांधवाची उपस्थिती
नितेश गट्टीवार गडचिरोली (चामोर्शी),दि.२२ मार्च:
रमजान महिन्याचा समाप्तीनिमित्त चामोर्शी शहरात ईद -उल- फित्रचा सण मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात आजरा करण्यात आला .

चामोर्शी येथील जामा मस्जिदमध्ये दि.२१ मार्च सकाळी ९ वाजता ईद -उल-फित्रची नमाज अदा करण्यात आली. मस्जिदचे हाफिज यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे नमाज अदा केली.
तसेच परिसरातील मुस्लिम बांधव उपस्थित होते. तसेच एकमेकांना अलिंगन देत ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्यात आले.

