
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची : तालुक्यातील कोटरा ते बोगटोला रस्त्यालगतच्या गाव तलावाजवळ एका 25 ते 35 वयोगटातील अनोळखी युवकाचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्या युवकाची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला जमिनीत पुरले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरची पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत या घटनेचा उलगडा करण्यासाठी तपास सुरू केला आहे.
कोरची पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सदर मृतदेह तलावाजवळ खड्डा करून त्यात पुरण्यात आला होता. पण तो पूर्णपणे जमिनीखाली नसल्याने मृतदेहावरील माती बाजुला होऊन तो थोडा उघडा पडला होता. मृतदेह कुजण्याच्या स्थितीत असल्याने तो 8 ते 10 दिवसांपासून तिथे होता असे पोलिसांनी स्पष्ट केले.

मुलेटिपदीकसा या गावचे पोलीस पाटील ईश्वरदास सत्तर कल्लो यांच्या तक्रारीवरून कोरची ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख आणि गावकऱ्यांनी मिळून तिथे पाहणी केली. त्या इसमाच्या अंगात पॅन्ट व शर्ट घातलेला असून दोन्ही हातात कडे होते. चेहरा पूर्णपणे काळा पडून अंगाला अळ्या लागलेल्या दिसत होत्या. पोलिसांनी मर्ग दाखल करत या घटनेचा तपास सुरू केला आहे. newsjagar
दोन वर्षाआधी गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवाद सम्पुष्ठात आल्याची घोषना पोलीस अधिक्षकानी केली होती. नक्षलवाद बर्यापैकी सम्पला आहे. परंतु दुसरी गोष्ट म्हणजे अवैध धन्द्याना उत आला आहे.
कोरची तालुका अवैध धंद्याचे खुलेआम साम्राज्य बनले आहे.प्राप्त माहितीनुसार कॅसिनो क्लब कोटरा, बोटेकसा, मसेली/ कोलाटोला, कोटगुल/ अन्तरगाव परिसरात चालतात, या ठिकाणी शहरातील मोठी मानसे येतात. त्यांच्यासाठी बाई, बाटली व मटन/ चिकनची व्यवस्था असते. सागवान लाकडाची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात जनावरे कत्तलखान्यात जातात. कोम्बड्यान्च्या बाजारात बोली लावून जुगार खेळला जातो. हे सर्व असतील तर सट्टेबाज कसे सुटतील? हे सर्व अवैध धन्दे खुल्लमखुल्ला सुरु आहेत.
यापैकी अवैध धन्दे करणाऱ्या लोकामध्ये बर्याचदा वाद होतात. अशाच वादात मृतकाचा खुन झाला असावा अशी तालुक्यात चर्चा आहे.
राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आपल्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. हे विशेष.

