
न्यूज जागर, अंबाजोगाई
महसुल विभागातील अंबाजोगाई चे तहसीलदार विलास तरंगे व त्यांच्या सहयोगी चा अंदाजे ५० कोटीचा भ्रष्टाचार लोकशाही च्या चौथ्या स्तंभाच्या माध्यमातुन शासना पर्यंत पोहचविण्यासाठी लाचखोर पञकारांनी केली प्रत्येकी दोन हजार रुपयाची मागणी
महसुल मंञी चंद्रशेखर बावनकुळे यांनी गाणं गायन करणार्या तहसीलदार विरुद्ध निलंबनाची कारवाई करतात तर पुरावे असतांना तरंगे व त्यांचे सहयोगी वर कारवाई ठप्प का

खळबळजनक बातमी छञपती संभाजीनगर (औरंगाबाद) च्या पञकारांचा खरा चेहरा आदर्श मिडीया एसोसिएशन च्या स्टिंग ऑपरेशन च्या माध्यमातुन उजागर झाला. *एन पी महिला व बाल सुरक्षा कल्याण फाउंडेशन च्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष प्रियाताई झांबरे यांनी पञकार परिषद घेण्यापुर्वी दुरध्वनी द्वारे पञकारांशी संपर्क केला विचारपुस केली की छञपती संभाजीनगर येथे पञकार परिषद घेण्याकरीता काय करावे लागेल त्यावेळेस जवळपास दोघा तीघांनी प्रिन्ट मीडिया व वृत्तपञाचे संपादक यांनी सांगीतले की फक्त नियमाप्रमाणे पञकार भवनात चहा नास्ता करीता दोन हजार रुपए भरावे लागतात त्यानुसार प्रियाताई झांबरे यांनी सर्व प्रोसीजर केली. १५० ते २०० पानाचे प्रिन्ट काढुन पञकारांना प्रेस नोट सोबत देण्यात आले. पञकार परिषद घेण्यापुर्वी पञकारांनी कोणत्याही प्रकारची पैशाची मागणी केली नाही.
परंतु जेव्हा एन पी महिला व बाल सुरक्षा कल्याण फाउंडेशन च्या तसेच आदर्श मिडिया एसोसिएशन च्या महाराष्ट्र अध्यक्षा प्रिया ताई झांबरे यांनी पञकार भवनात पोहचुन पञकार परिषद घेतली त्यानंतर पञकार भवनात असलेले १५ ते २० पञकारांनी प्रियाताई झांबरे यांना घेरले व प्रत्येकी (२०००/-) दोन हजार रुपयाची मागणी करने सुरु केली हट्ट धरला की प्रत्येकी दोन हजार रुपए द्या तरच आम्ही बातमी प्रकाशित करु. *चला इलेक्ट्रॉनिक मीडिया ला सोडा पण प्रिन्ट मीडिया (वृत्तपञ) चे काही पञकार, संपादक हाजर होते त्यांनी देखील बातमी प्रकाशित केली नाही.


एन पी महिला व बाल सुरक्षा कल्याण फाउंडेशन व आदर्श मिडीया एसोसिएशन च्या महाराष्ट्र अध्यक्षा यांनी स्टिंग ऑपरेशन केले तेव्हा समजले की लोकशाही चा चौथा स्तंभ हा सामाजिक मुद्दे, भ्रष्टाचार उजाकर करण्यासाठी नसुन ते फक्त खिशे भरण्यासाठी पञकारीतेचा व्यवसाय सुरु केला आहे. *अंबाजोगाई तहसील चे तहसीलदार विलास तरंगे, मंडळ अधिकारी राम मगर व तलाठी संतोष चव्हाण यांनी शासन सेवेत राहुन बेकायदेशीर नियमबाह्य पणे शासनाच्या नियमाला धाब्यावर ठेवले आणी कोट्यावधी रुपये कमविण्यासाठी बेकायदेशीर आदेश पारीत केल्याची माहिती प्रियाताई झांबरे यांनी पञकार परिषदेत सांगीतले. ऐवढेच नाही तर विभागीय आयुक्त छञपती संभाजीनगर यांनी महसुल मंञी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशाचा अवमान केला. विभागीय आयुक्त छञपती संभाजीनगर यांनी विश्वासानी ज्यांना Special Investigation Team (SIT पथक) म्हणुन नियुक्ती केली त्या सिट पथकात कार्यभार सांभाळणारे अधिकारी देखील तहसीलदार यांचा बचाव करण्यात दोन महिने वाया केले तरी चौकशी चा काही पत्ता नाही *एन पी महिला व बाल सुरक्षा कल्याण फाउंडेशन नी दिलेले सर्व प्रथमदर्शनी पुरावे तहसीलदार विलास तरंगे, मंडळ अधिकारी राम मगर व तलाठी
संतोष चव्हाण यांना निलंबित करण्यासाठी पुरेशे असतांना SIT समिती प्रमुख ने वेळकाढु पणा करत असल्याची माहिती प्रियाताई झांबरे यांनी दिली.

या गंभीर प्रकरणात महसुल मंञी चंद्रशेखर बावनकुळे, अपर मुख्य सचिव (महाराष्ट्र शासन) खारगे साहेब, विभागीय आयुक्त छञपती संभाजीनगर यांनी कोणतीही दखल घेतली नाही कारण कदाचीत तहसीलदार विलास तरंगे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा वाटा महसुल विभागातील अधिकारी मंञी यांना मिळत असल्याचा आरोप प्रियाताई झांबरे यांनी केला. ऐकीकडे तहसीलदारानी गाणं गायन केल्यासाठी महसूल मंञी चंद्रशेखर बावनकुळे त्यांना निलंबित केले मग तहसीलदार विलास तरंगे, मंडळ अधिकारी राम मगर व तलाठी संतोष चव्हाण यांनी भ्रष्टाचार केला तर बीड जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकारी यांना हाताशी धरुन राम मगर यांच्या बदली प्रकरणात विभागीय आयुक्त यांची बोगस स्वाक्षरी करुन बदली आदेश दिल्याचे पुरावे महसुल मंञी, महसुल अधिकारी,SIT समितीकडे,तसेच छञपती संभाजीनगर येथील पञकारांकडे दिले तरी देखील कारवाई करण्यात आली नाही.



तहसीलदार विलास तरंगे व त्यांच्या सहयोगी वर कारवाई न करता इलेक्शन नंतर बदली करण्याचे षडयंत्र सुरु असल्याची माहिती सुञाकडुन मिळाली आहे असे झाल्यास महसुल विभागाच्या व SIT समीती च्या विरुद्ध उच्च न्यायालय खंडपीठ छञपती संभाजीनगर येथे रिठ याचिका दाखल करण्यात येईल अशी माहिती प्रियाताई झांबरे यांनी दिली.#newsjagar


तसेच छञपती संभाजीनगर च्या पञकारांनी पञकार परिषद संपल्यानंतर प्रत्येकी दोन हजार रुपयाची लाच मागणी केली २० पञकारांना ४०,०००/- (चाळीस हजार) रुपये दिले नाही त्यामुळे बातमी प्रकाशित झाली नाही किंवा ज्यांच्या विरोधात पञकार परिषद घेतली त्यांनी सदर पञकारांना लाच देऊन बातमी लावु दिली नाही परंतु प्रियाताई झांबरे यांना झालेला मानसिक शारीरिक व आर्थिक ञास याबाबत Press council of India, press council of maharashtra chairman, प्रधान सचिव तथा महा संचालक माहिती व जनसंपर्क महासंचनालय व पोलीस महासंचालक कडे तक्रार दाखल करुन पञकारांविरुद्ध मान उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात येईल असे पञकार यांचेशी बोलतांना प्रियाताई झांबरे यांनी सांगीतले.

