
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची. दि. 9/12/2025
कोरची नगरपंचायत हद्दीतील विविध समस्या सोडवण्यासाठी 10 डिसेंबर पासून आमरण उपोषण करण्यात येईल असे गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना 4 डिसेंबर ला तहसिलदार मार्फत निवेदन दिले होते. याच विषयाला घेऊन कोरची येथील नगरवासी 8 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा केली.निवेदनातील सर्वच समस्या गंभीर स्वरूपाच्या आहेत,नगरपंचायत च्या विकासासाठी येणाऱ्या निधीचा दुरूपयोग झाला असेल तर संबंधित जबाबदार अधिकारी, किंवा पदाधिकारी यांचेवर नक्कीच कारवाई करण्यात येईल, या सर्वच समस्या सोडवण्यासाठी एका अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल आणि सर्वच समस्या सोडवण्यात येतील असे निवासी जिल्हाधिकारी स्मीता मोरे यांनी आश्वासन दिले.9 डिसेंबर ला मुख्याधिकारी गणेश सोनवणी यांनी नगरपंचायत कार्यालयात आंदोलन कर्त्यांना बोलावून निवेदनात दिलेल्या नगरपंचायत स्तरावरील समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे उपोषण तुर्तास स्थगित करण्यात येत आहे असे नगरसेवक डॉ शैलेंद्र बीसेन, शालीकराम कराडे, नंदकिशोर वैरागडे,निरिंगसाय मडावी, गुरूदेव मेश्राम, हीरामन मोहुर्ले, आनंद पंदरे यांनी सांगितले. #newsjagar
नगरपंचायत हद्दीतील समस्या, जसे गावातील मुख्य रस्ता पुर्णतः उखडला आहे, त्या रस्त्याचे बांधकाम तातडीने करावे, 2015 पासून आजपर्यंत झालेल्या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, त्याची सीबीआय चौकशी करावी, 2018 मध्ये झालेल्या सिटी सर्वे मध्ये मोठ्या प्रमाणात चुका झाल्या असून नव्याने सिटी सर्वे करून सुधारित सनद व आखिव पत्रिका द्यावे, 18 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयानुसार कोरची नगरपंचायत हद्दीत रोजगार हमी योजना सुरू करावे, चिकन, मटण, मच्छी मार्केट गावाबाहेर करावे, मोकाट जनावरांना गो शाळेत पाठवावे, घनकचरा व्यवस्थापनात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी नवीन टाकी बसवावे, 2011 पूर्वीच्या लोकांना लाभार्थी लोकांना सरसकट घरकुल मंजूर करावे, 2 कोटी रुपये खर्च करून लावण्यात आलेल्या खांबांना लाईट लावावे, मरारटोली ते कोचीनारा नाल्या पर्यंत 33 लाख रुपयाचे ईलेक्ट्रीक पोल लावल्याचे दाखवून निधी उचल केले,7 लाख रुपये खर्च करून स्मशान भुमीत हायमाॅस लावल्याचे दाखवून निधी उचल केले.परंतु प्रत्यक्षात काम केले नाही.याची चौकशी करावी व दोषींवर गुन्हा दाखल करावे.अशाप्रकारच्या मागण्या सोडवण्यासाठी गावकऱ्यांनी 23 सप्टेंबर ला तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला होता.परंतु आश्वासन देऊनही आजपर्यंत एकही समस्या सोडविण्यात आली नाही.त्यामुळे गावकरी पुन्हा ह्याच समस्या सोडवण्यासाठी 10 डिसेंबर पासून आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले होते.वरील समस्या गंभीर स्वरूपाच्या आहेत त्यामुळे समस्या सोडविण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल व समस्या सोडविण्यात येतील.असे निवासी जिल्हाधिकारी स्मीता मोरे यांनी तिथे गेलेल्या शिष्टमंडळास आश्वासन दिले.यावेळी शेडमाके जिल्हा अध्यक्ष,शिवसेना उबाठा, नंदू कुमरे उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष उबाठा गडचिरोली गेडाम जिल्हा युवा अध्यक्ष शिवसेना उबाठा गडचिरोली, शालीकराम कराडे,निरिंगसाय मडावी, प्रभाकर कराडे, श्रीहरी मोहुर्ले, अजित मोहुर्ले, शामकला सहारे, नगरसेविका मालता हिळामी, रेखा चौरे, यशोदा घुगवा,असवंतीन मीरी, शिशुला शेंदरे उपस्थित होते.जिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिले त्यामुळे उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले.


