Fast unto death from December 10 to resolve various issues within the Korchi Nagar Panchayat area.

श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची
दिनांक 4/12/2025
कोरची नगरपंचायत विविध समस्याने ग्रासले आहे.2015 पासून विविध योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, त्याची सीबीआय चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावे, रस्त्याचे बांधकाम तातडीने करावे, चुकीचे झालेले सीटी सर्वे पुन्हा करून सनद व आखिव पत्रिका द्यावे, घरकुलाचा लाभ गरजूंना द्यावे, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे लवकर सुरू करावे, घनकचरा व्यवस्थापनापनात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, बाजारासाठी राखून ठेवलेल्या जागेतील 25 पैकी 25 अतिक्रमणे हटवून मंजूर झालेले बाजार संकुल बांधण्यात यावे, 33 लाख रुपये खर्च करून लाईट लावल्याचे दाखवून निधी उचल केले, 7 लाख रूपयाचे स्मशानात भुमीत हायमाॅस लावल्याचे दाखवून निधी उचल केले, याची सीबीआय चौकशी करावी, 2 कोटी रुपये खर्च करून खांब उभे केले. त्या खांबांना लाईट लावावे. या व अशा 22 मागण्या पूर्ण करण्यासाठी 23 सप्टेंबर ला गावकऱ्यांनी मोर्चा काढला होता परंतु एकही समस्या सोडवण्यात आली नाही. त्यामुळे सदर समस्या सोडवण्यासाठी गावकऱ्यांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले की, सदर मागण्यासाठी 10 डिसेंबर पासून नगरपंचायत हद्दीत आमरण उपोषण करण्यात येईल. newsjagar

Fast unto death from December 10 to resolve various issues within the Korchi Nagar Panchayat area.
निवेदनात नगरसेवक डॉ. शैलेंद्र बीसेन, नगरसेविका प्रतिभा लालदास मडावी, नगरसेविका नीरा परदेशी बघवा,रोशन बोरकर, शालीकराम कराडे, नंदकिशोर वैरागडे, निरिंगसाय मडावी, गुरुदेव मेश्राम, हीरामन मोहुर्ले, ईश्वर साखरे, सिताबाई हिळामी, धर्मोतीन भोयर, यशोदा घुगवा, रूपबती खोबा, ममता भोयर, असवंतीन मीरी, रेखा चौरे, सुशीला शेंद्रे, दिनाबाई बघवा, आशा शर्मा, समस्याद शेख, मानबाई बघवा, दिपक वालदे उपस्थित होते. या निवेदनावर 131 लोकांनी सह्या केले आहेत.


