korchi news

श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची.
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केल्यानंतर आता सातबारा उताऱ्याच्या ऑनलाईन अपडेट प्रक्रियेच्या उशीरीमुळे शेतकऱ्यांवर आणखी एक संकट कोसळले आहे.
आदिवासी विकास महामंडळाकडून धान्य खरेदीच्या, आवश्यक असलेली ही प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसल्याने शेतकरी खुल्या बाजारात व्यापाऱ्यांना मातीमोल भावात धान्य विक्री करण्यास भाग पडत आहेत. आमचे कष्ट वाया जात आहेत, शासनाने तात्काळ मदत करावी. अशी हळहळ व्यक्त करत महामंडळाने तातडीने केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांचे 40-50% पीक नष्ट झाले. जे काही धान्य हाती आले, ते विकून कुटूंबाच्या गरजा, मुलांचे शिक्षण,कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. मात्र धान्य खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी प्रथम सातबारा ऑनलाईन अपडेट करून इतरही कागदपत्रांची पुर्तता करावी लागते. ही प्रक्रिया रखडल्याने शेतकरी नोंदणीसाठी प्रतिक्षेत आहेत. परिणामी स्थानिक व्यापारी कमी किमतीने धान्य खरेदी करीत असून शेतकऱ्यांना शासकीय आधारभूत किमतीपेक्षा 200-300 रूपये प्रती क्विंटल कमी मिळत आहेत. newsjagar
स्थानिक शेतकरी नंदकिशोर वैरागडे यांनी सांगितले , सातबारा ऑनलाईन अपडेट करण्यासाठी आदिवासी महामंडळाकडून खरेदी केंद्रावर गेलो परंतु ऑनलाईन प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही. व्यापारी 1800 ते 2000 प्रती क्विंटल धान्य खरेदी करीत आहेत. शासकीय आधारभूत किंमत 2300 रूपये आहे. आदिवासी विकास महामंडळाने तातडीने सातबारा ऑनलाईन अपडेट करून धान्य खरेदी केंद्र सुरू करावी अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.


