
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी
कोरची. दि .26/10/25
अचानक कोरची तालुक्यात विजेच्या गडगडाटीसह पाऊस पडला.

धानाची कापनी सुरू आहे.काहींनी पुंजण्यावर ताळपत्री टाकण्यासाठी कोरची इथून 18 किमी अंतरावर असलेल्या केसालडाबरी शेत शिवारात आज दुपारी 1.30 च्या दरम्यान विज पडून 17 वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला तर त्याचा सोबती योगेश घावळे वय 17 गंभीर जखमी झाला आहे.
सरगम सोमनाथ कोरचा वय 17 असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून हा मुलगा छत्रपती विद्यालय मसेली या शाळेत 10 व्या वर्गात शिकत होता. सरगम कोरचा यांच्या शेतात धान कापनी सुरू आहे.धानाच्या पुंजण्यावर प्लास्टिक टाकण्यासाठी हे दोघेही गेले होते. दिवाळीच्या सनानिमित्याने त्याच्या घरी आलेला सोबती योगेश घावळे हा त्याचा नातेवाईक असून गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील गुजूरबडगा गावातील रहिवासी आहे.
आज दुपारी 1.30 च्या दरम्यान विजेच्या गडगडाटीसह पाऊस पडला.शेतावर असलेले धानाचे पुंजणे पावसाने भिजू नये म्हणून पुंजण्यावर ताळपत्री टाकण्यासाठी दोघेही शेतात गेले होते. पाऊस सुरू होता म्हणून हे दोघेही शेतातील मोहाच्या झाडाखाली होते.वडील सोमनाथ काही अंतरावर होते.झाडावर वीज पडली आणि सरगम आणि त्याचा सोबती जागीच पडले. सोमनाथ ने गावकऱ्यांना बोलावून घेतले व दोघांनाही दवाखान्यात घेऊन जाण्याची तयारी केली. याच दरम्यान योगेश घावळे शुध्दीवर आला परंतु सरगम कोरचा यांच्या शरिरातील हालचाली बंद पडल्याचे दिसले.त्यामुळे योगेश घावळे याला चिचगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे हलविण्यात आले अशी माहिती आहे.
तर सरगम कोरचा याला ग्रामीण रुग्णालय कोरची येथे आणण्यात आले.सरगम कोरचा याला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर योगेश घावळे यांचेवर उपचार सुरू केले आहे.
डॉ.हितेश वंजारी यांनी सरगम कोरचा यांच्या शवाचे विच्छेदन ग्रामीण रुग्णालयात केले. प्राथमिक तपासात विजेच्या कडकडाटामुळे हा अपघात झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विजेच्या हंगामात शेतकऱ्यांसाठी विशेष सुचना देण्यात आल्या आहेत. यात वादळी हवेच्या वेळी शेतातून बाहेर पडणे टाळावे, धातूच्या वस्तीपासून दूर राहावे, आणि झाडांखाली थांबु नये. असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या वर्षीही या परिसरात अशा घटना घडल्या होत्या.
सरगम कोरचा यांच्या मृत्यूमुळे मसेली परिसरातील केसालडाबरी गावासह 7-8 गावात शोककळा पसरली आहे. शासनाने चौकशी करून तातडीने आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी होत आहे.

