सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
चामोर्शी – जिल्हा परिषद शाळेपासून जाणाऱ्या जुन्या तहसील बायपास रस्त्याचे नव्याने बांधकाम करण्यात यावे याकरिता येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी व जिल्हा सह आयुक्ता नपाप्र शाखा याचेकडे निवेदना द्वारे मागणी केली आहे.
नगरपंचायत चामोर्शी येथील प्रभाग क्रमांक १६ व १७ मधील येत असलेल्या डॉ . इंद्रजित नागदेवते ते जुनी तहसील कार्यालयापर्यंत रोडची दुरवस्था झाली असुन जागोजागी मोठमोठी खड्डे पडून रस्त्याची झाळण झाली आहे . शहरात व इतर गावातील नागरिकांना या रस्त्याने जाणे येणे करताना नाहत्रास सहन करावा लागत आहे सध्या स्थिती त्या रस्त्यालगत विविध कार्यालय आहेत यामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय , जुनी तहसील कार्यालय, भूमी अभिलेख ,तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय , दुय्यम निबंधक कार्यालय , वन विभागाचे कार्यालय ,नर्सिंग कॉलेज ,छत्रपती शाहू महाराज सायन्स कॉलेज असून नागरिकांना आपल्या शासकीय व खाजगी कामाकरिता खेडेगावावरून शहराच्या ठिकाणी विविध कार्यालयात याच रस्त्याने येणे जाणे करावे लागत असून या रस्त्याने मोठी वर्दळ असते त्यामुळे या रस्त्याची झालेली दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या रस्त्याने अवागमन करणाऱ्या टू व्हीलर , फोर व्हीलर व पादचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून या रस्त्याने अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्यामुळे जिल्हा वार्षिक योजना सन २०२५ – २०२६ अंतर्गत या रस्त्याचे नव्याने सिमेंट काँक्रेट रोडचे व नालीचे बांधकाम करण्यात यावे .याकरिता नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून मागणी केलेली आहे .
यावेळी निवेदन देताना डी.एस . रामटेके ,डी .व्ही .बोरकर , सुनील तुरे ,डी .बी . चीतारकर , शिवराम बारसागडे ,रमेश नैताम , भाऊराव खोब्रागडे , रामधन इंगोले , गीतेश्वर नैताम ,सुमेध तुरे उपस्थित होते .
–प्रभाग क्रमांक १६ व १७ मध्ये डॉ . नागदेवते ते पतिवार यांच्या घरापर्यंत सीसी रोडचे बांधकाम करणे तसेच अभय बर्लावार बर्लावार ते सीएसटी सेंटर पर्यंत सी सी रोडचे बांधकाम जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत नगरपंचायत चामोर्शी करीता निधी उपलब्ध करून देण्यात यावे . अशी मागणी यावेळी निवेदन देताना नागरिकांनी केली आहे .
