
न्यूज जागर गडचिरोली
चामोर्शी, दि. २४ : मे व जून २०२६ या कालावधीतील स्वस्त अन्नधान्य वितरण तसेच ई-पॉस (EPOS) मशीनद्वारे व्यवहार पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी NSUI च्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात चामोर्शी तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
शासनाच्या निर्देशानुसार स्वस्त धान्य दुकानांमार्फत अन्नधान्य वितरणाची प्रक्रिया सुरू असली, तरी विविध तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमुळे अनेक लाभार्थ्यांना अद्याप अन्नधान्य मिळू शकलेले नाही. परिणामी, अनेक पात्र नागरिक त्यांच्या हक्काच्या धान्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर कोणताही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी मे व जून २०२६ मधील अन्नधान्य वितरणाचे ई-पॉस मशीनद्वारे व्यवहार पूर्ण करण्यासाठी चालू महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
हे निवेदन नायब तहसीलदार नरोटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी NSUI तालुका उपाध्यक्ष ओम प्रकाश चौधरी, संजय बुरांडे, कालिदास बुरांडे यांच्यासह NSUI चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

