
आमदार अभिजीत वंजारी यांच्या हस्ते उद्घाटन
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली,९ ॶॉगस्ट : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, महिला, युवक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध गंभीर प्रश्नांवर थेट संवाद साधण्यासाठी दि. ९ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात ‘चरखे के पास चर्चा’ या लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी राजीव गांधी सभागृह, गडचिरोली येथे आमदार अभिजीत वंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

देशात आणि समाजात वाढत चाललेला द्वेष, अत्याचार व हिंसक प्रवृत्ती, तसेच शासनाच्या धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व कष्टकरी वर्गावर निर्माण होत असलेल्या अडचणी यावर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली. चुकीची धोरणे व कायदे जनतेवर लादले जात असून, गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली सुपीक शेतजमिनींचे अधिग्रहण करून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न सुरू असून
या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत स्वातंत्र्याच्या मूल्यांचा जागर, विचारांचे मंथन आणि भविष्यातील दिशा निश्चित करण्यासाठी ‘चरखे के पास चर्चा’ या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर नागरिक, शेतकरी, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्याशी थेट संवाद साधला जाणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी तसेच जिल्ह्यातील मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सुरू असलेला लढा महात्मा गांधींच्या अहिंसा, सत्य आणि लोकशाहीच्या मार्गाने अविरतपणे सुरू राहील, असा निर्धार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
‘चरखे के पास चर्चा’ या उपक्रमाच्या माध्यमातून पुढील सात दिवस जिल्ह्यातील विविध तालुके व भागांतील नागरिकांच्या समस्या, शेतजमिनींचे प्रश्न, रोजगार, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, महिला व युवकांचे प्रश्न तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विचारमंथन करण्यात येणार आहे.
महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृवात सुरु असलेल्या या कार्यक्रमाला आमदार अभिजीत वंजारी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे, दिवाकर निसार प्रभाकर वासेकर, नगरसेवक, न.प. गडचिरोली तथा शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली, सतीश विधाते, अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव कुसुमताई आलाम, नगरसेविका मेघाताई वरगंटीवार, नगरसेविका मनीषाताई खेवले, माजी जि.प. सदस्य कविताताई भगत, पुष्पलताताई कुमरे, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गवतुरे, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चामोर्शी प्रमोद भगत, जिल्हाध्यक्ष पर्यावरण विभाग राजेश ठाकूर, गजानन नैताम, , ढिवरू मेश्राम, हरबाजी मोरे, उपसरपंच गुरुवळा अनिल कोठारे, उत्तम ठाकरे, पांडुरंग घोटेकर, गजानन नैताम, दत्तात्रय खरवडे, रुपेश टिकले, रजनीकांत मोटघरे, रोडे महाराज, विजय लाड, जितेंद्र मुनघाटे, विपुल येलटीवार, गौरव येनप्रेड्डीवार, संजय मेश्राम, महादेव भोयर, रीताताई गोवर्धन, कविताताई उराडे, सुधीर बांबोळे, प्रफुल बारसागडे, तेजस कोंडेकर , यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, युवक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

