
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची : कोरचीपासून पूर्वेला सुमारे ६ किमी अंतरावर असलेल्या मौजा कुकडेल येथे दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता जागतिक आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गाव परिसरात विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी गावातील स्वच्छता व आरोग्य याबाबत जनजागृती करण्यासाठी नागरिकांना डस्टबिन व सुपलीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये पर्यावरण व स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली.

कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून श्री. भारत नुरूटी (पोलीस पाटील), श्री. सियाराम हलामी, श्री. मन्साराम नुरूटी, रमेश तुलावी (सरपंच, ग्रामपंचायत दवंडी), लहानू सहारे, सिंधू नंदेश्वर, बासमोती हलामी, नमिता नंदेश्वर, उमा सहारे, अनिल नंदेश्वर, यशवंत सहारे, मंगेश सहारे, किशोर नंदेश्वर, विजय नुरूटी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन दीपक हलामी यांनी केले, तर आभार प्रदर्शन कृष्णा हलामी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

