सोनू वाळके,जिल्हाप्रतिनिधी.
चंद्रपूर : (मूल) दिवाळीच्या तोंडावर चंद्रपूर अन्न व औषध प्रशासनाने मूल येथील सारडा खाद्येतल रिफायनिंग कारखान्यावर धाड टाकून सुमारे २२ लाख ६८ हजार ३६८ रुपये किमतीचा तब्बल १४ हजार २८ क्विंटल खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे. पॅकिंगकरिता पुनर्वापर केलेले टिन व कमी दर्जाचे असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
नफा दसरा, दिवाळी या सणाच्या कालावधीत अधिकच्या कमावण्यासाठी खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, मूल येथे भेसळ तेलाचा साठा असल्याची माहिती सहायक आयुक्त प्रवीण उमप यांच्या पथकाला मिळाली. दरम्यान, मंगळवारी
या पथकाने जेठमल भंवरलाल सारडायेथील खाद्यतेल रिपॅकर येथे धाडटाकली. यावेळी विविध बँडचे नमुनेघेऊन १४ हजार २८ क्विंटल तेलाचासाठा जप्त केला. ही कारवाईपॅकिंगकरिता पुनर्वापर केलेले टिनवापरल्याने व कमी दर्जाचे असल्याच्यासंशयावरून सहायक आयुक्त (अन्न) उमप व गुप्त वार्ता अन्न सुरक्षाअधिकारी ललित सोयाम व रावसाहेबवाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीशसातकर यांच्या चमूने केली.तपासणी पथके गठित
दिवाळीत हॉटेल, उपहारगृहात मिठाई, पेढे व खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासनाने तपासणी पथके गठीत केली आहेत. कुठेही भेसळ खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचा संशय असल्यास चंद्रपूर अन्न व औषध प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त प्रवीण उमप यांनी केले आहे.
अन्न सुरक्षा विभागाने ग्राहकांना स्वस्त दरातील किंवा अनोळखी ब्रँडचे तेल खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात पुढील काळातही अशा कारवाया सुरू राहतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
