सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
विभागीय आयुक्त यांनी पुरातत्व विभागाच्या कर्मचारी कडून मार्कंडा देवस्थान चा इतिहास जाणून घेतला.
चामोर्शी :(14 ऑक्टोबर) मार्कंडा देव क्षेत्रात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास व सौंदर्यीकरण कामांची पाहणी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी केली. या वेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामे गुणवत्तापूर्ण व निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
पाहणी दरम्यान मंदिर परिसरातील रस्ते, प्रकाश व्यवस्था, पायाभूत सुविधा, पार्किंग व्यवस्था, तसेच भक्तांसाठी करण्यात येणाऱ्या सुविधा यांची माहिती अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना दिली. आयुक्तांनी कामांमध्ये गती आणण्यावर भर देत स्थानिकांच्या सूचना व गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश दिले.
या वेळी एमएसआरडीसीचे अधिकारी,जिल्हाधिकारी अविशांत पंडा ,सहा जिल्हाधिकारी अरुण एम., उप अधिक्षक डॉ सोनवणे,(पुरातत्व विभाग)जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, तसेच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. मार्कंडा देव परिसरातील हा विकास आराखडा पूर्ण झाल्यास या क्षेत्राचे धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व अधिक वाढेल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
