
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
प्रेसनोट
गडचिरोली – दि. 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आदिवासी आक्रोश मोर्चाला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नई दिल्ली शाखा गडचिरोली च्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. या मोर्चामध्ये आदिवासी समाजाच्या विविध हक्क, न्याय आणि अस्तित्वाच्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

या संदर्भात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हा महासचिव उमेश उईके, जिल्हा सचिव सुरज मडावी, महिला जिल्हाध्यक्षा पुष्पलता कुमरे तसेच महिला जिल्हा सचिव विद्या दुग्गा, जिल्हा उपाध्यक्ष वामन जुनघरे, देवराव आलाम, जिल्हा संघटक देवेंद्र राणे, जिल्हा कोषाध्यक्ष शेमनशाह आत्राम, जिल्हा सहसचिव विलास उईके, मारोतराव इचोडकर, तालुका अध्यक्ष तुषार मडावी, शहर अध्यक्ष निलेश आत्राम, शहर उपाध्यक्ष श्याम सलामे, शहर सचिव रोहित आलाम, शहर सहसचिव प्रफुल्ल कोडाप, तालुका उपाध्यक्ष संजय मसराम, महिला तालुका अध्यक्ष लिना कोकोडे, महिला शहर अध्यक्ष आरती कोल्हे, मालता पुडो, रेखा तोडासे, आरती कंगाले, वनिता ताराम, तनुजा कुमरे, शारदा मडावी, स्मिता नैताम, रोहिणी मसराम, माधुरी पडोती, अर्चना टेकाम, पुष्पा कुमरे, रोशनी उसेंडी, नलिनी कोवे, बबिता उसेंडी, मायाबाई उसेंडी, शामला घोडाम यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे जाहीर केले की, आदिवासी समाजावर वाढत चाललेले अन्याय, जंगल-जमीन विषयक अन्यायकारक निर्णय, तसेच संविधानिक हक्कांच्या अंमलबजावणीसाठी एकजूट दाखविण्याची ही वेळ आहे.
समस्त आदिवासी समाज बांधव, भगिनीवर्ग व युवा वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहनही आदिवासी विकास परिषद च्या वतीने या वेळी करण्यात आले.

