
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
चामोर्शी:-
गडचिरोली जिल्ह्यातील सगळ्यात मोठी तहसील म्हणून चामोर्शी ला ओढखल्या जाते त्यात पेसा कायद्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात खासदार व आमदार हा अनुसूचित जाती समाजातून प्रतिनिधींवत्व करत असून एवढ्या दशकापासून आदिवासी समाजचीच प्रगती अजून झाली नाही.
विविध सुख सुविधांपासून वंचित ठेवल्या जातात आहे.
महाराष्ट्रात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टी चे सरकार असून फक्त गडचिरोली जिल्ह्यासाठी विकासाची गोष्ट करतात परंतु प्रत्यक्ष विकास शून्य!
चामोर्शी ही मोठी नगरपंचायत असून
नगरविकासाच्या नावाने मोठा निधी नगरपंचायत ला मिळतो. नगरपंचायत प्रशासन कडून ज्या वेगानं विकास व्हायला हवा तो होत नसुन ज्या जोराने विकास कामे होऊन चामोर्शी चा चेहरा-मोहरा बदलायला पाहिजे परंतु अस न होता काही वर्षांपासून विकास खुंटत असल्याचे नागरिक यांच्यात कुजबुज चर्चा ऐकायला मिळतो आहे.
विकासाकडे प्रशासनाचे मुद्दामही लक्ष्य नाही.टॅक्स च्या नावावर लोकांकडून विविध कर वसुली केली जाते परंतु स्थानिक लोकांना मात्र सुख सुविधांपासून वंचित राहावे लागते.
कमीत कमी मुख्य मार्गावर काॅंक्रेट चे पक्के रस्ते नाही,पार्किंग नाही,लहान मुलांना साजेशे मनोरंजन,करमणूकी करीता गार्डन नाही,लायब्ररी नाही,स्विमिंग पूल नाही,नाल्या चे बांधकाम पूर्ण नाही अशा अनेक समस्येला लोकांना सामोरे जावे लागते परंतु स्थानिक प्रशासन मुंग गिळून गप्प, तसेच मार्कंड मोहल्ला रोड रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी हालत दिसून येते,तरी झोपेचं सोंग घेऊन नगर पंचायत काम करताना दिसत आहे.त्यात राजमाता आश्रम शाळा ते जुना तहसील रोड खड्डेमय झालं असून नाहक त्रास स्थानिक लोकांना तसेच शाळेतील मुला मुलींना सहन करावा लागत आहे तरी प्रशासन गप्प जे जनसामान्यांचे हक्क आहेत लोकांना मिळायला पाहिजे परंतु मिळत नसून सुविधांपासून वंचित आहेत.
स्थानिक लोकांची मागणी आहे की, संपूर्ण वार्डा वार्डात भौतिक सोयी सुविधा देत प्रगती साधत कमीत कमी टप्याटप्याने तरी एक आदर्श वार्ड निर्माण व्ह्यायला पाहिजे अशी चामोर्शी वासीयांची अपेक्षा आहे.


