
पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेणे खड़े, अपघाताची मालिका सुरूच अमरावती,
अमरावती-पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावर मोठे खड्डे पडल्याने अपघाताची मालिका सुरू आहे. तसेच या मार्गांवर भेगा पडल्याने अपघाताच्या प्रकरणात वाढ झाल्याने परिसरातील युवकांनी प्रशासनाच अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला आहे.
वरूड, पुसला मार्गावर रस्त्याला भेगा पडल्यात. डांबरीकरण झाले तिथे रस्ता उखडला आहे. या खड्यात पडून अनेक वाहनचालकांना अपंगत्व आले. खड्डे बुजविण्याकरिता वारंवार निवेदन देऊनही दखल घेतली नसल्याने युवा मित्र मंडळाने कफन-दफन आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला.

अमरावती-पांढुर्णा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ के असून, हा महामार्ग पुसला गावातून जातो. या रस्त्या अनेक अपघात झाले आह यामध्ये कुणाचा प्राण गेला, तर कुणाला अपंगत्व आले. यासंदर्भात २ व १५ सप्टेंबर रोजी सुद्धा निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निवेदनाला केराची टोपली दाखवली. यामुळे नागरिक संतप्त झाले. पुसला येथील युवा मित्र मंडळ अध्यक्ष सूरज धर्मे यांच्या नेतृत्वात ‘कफन-दफन’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रद्युम्न तवले, जावेद शेख, पवन वाडिवे, सचिन ढोके, धीरज सावरकर, शुभम वडस्कर, राजू वरुडकर, प्रमोद पाटील, कमलेश खपरीये, योगेश श्रीराव, विशाल कलंबे, विनोद पाटील, नितीन सावले, विलास मरकाम, सागर फरतोडे, बलदेव सावले, नीलेश गोमकाळे सहभागी झाले.

