श्री . अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
विधानसभा निवडणुक २०२४ या निवडणुकीत संभाव्य उमेदवार म्हणून प्रशासनाला वेळोवेळी कचाट्यात पकडून कायद्याने घाम फोडणारे,जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक विनोदकुमार खोब्रागडे vinodkumar khobragade हे चंद्रपूर आणि वरोरा -भद्रावती निर्वाचन क्षेत्रातुन अपक्ष उमेदवार म्हणून आमदार साठी उभे राहनार असल्याची माहिती समोर आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील ,भारतातील गाजलेले व गाजत असलेले, नौकरीची पर्वा न करता मागील ३० वर्षांपासून दलित,वंचित, शोषित ,आदिवासी, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना, युवा बेरोजगार यांना न्याय व हक्कासाठी शासन ,प्रशासन यांना कायद्याने घाम फोडणारे,व सळोकीपळो करुन सोडणारे, कनिष्ठ न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयात जनहितासाठी जनहित याचिका दाखल करुन न्याय व हक्कासाठी २४तास ३६५दिवस कुठल्याही राजकीय पक्षाची मदत न घेता जे काम आमदार, खासदार, मंत्री,करु शकले नाही ते काम करुन दाखविले आहे ते (Vinodkumar Khobragade) विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तथा पटवारी तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा RTI कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर हे विधानसभा निवडणुक २०२४ वरोरा -भद्रावती मतदार संघातुन,व चंद्रपूर मतदार संघातुन आमदार साठी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहनार आहेत