सोनू वाळके,जिल्हाप्रतिनिधी.
जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके यांचे कार्यकर्त्यांना कामाला लागा अशा सूचना
चामोर्शी :-
चामोर्शी शहरातील सावतेली समाज भवन येथे स्थानिक स्वराज्य संस्था व जि. प. निवडणुका संदर्भात शिवसेना (उबाठा )पक्ष यांचा मोठ्या प्रमाणात विजय मिळविण्याकरिता आपआपल्या प्रभाग, वार्ड व तालुक्यातील प्रत्येक गावात आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करून निवडून आणावे यासाठी आजपासूनच कामाला लागावे अशी सूचना जिह्वाध्यक्ष वासुदेव शेडमाके यांनी कार्यकत्यांना सूचना दिल्या
या बैठकीला विलास भाऊ ठोबरे जिल्हा संघटक शिवसेना उबाठा, तसेच मनोज पोरटे तालुकाप्रमुख बंडुजी नैताम शहरप्रमुख, प्रशिक झाडे युवासेनाप्रमुख, जय सोवासिया, रितेश सोनुले युवासेना गडचिरोली व इतर शिवसैनिक शिवसेना ( उबाठा) पक्षाचे कार्यकर्ते या आढावा बैठकीत उपस्थित होते.
