
वर्धा – कंत्राटदारांना प्रलंबित देयके न मिळाल्याने कंत्राटदार निषेध व्यत करीत आहेत. शासनाकडे ५० टके निधीची मागणी करण्यात आली होती. परंतु, शासनाने केवळ ५ टके निधी वितरित करून कंत्राटदारांची फसवणूक केली असल्याचा आरोप कंत्राटदार संघटनेने केला आहे.
वर्धा जिल्ह्यातील कंत्राटदारांची ६५० कोटी रुपयांची देयके प्रलंबित असताना सार्वजनिक बांधकाम विभागाला केवळ १२ कोटी निधी देण्यात आला. प्रत्येक कंत्राटदाराला केवळ ५ टके प्रमाणात निधी वाटप करण्यात आले.
आर्वी सार्वजनिक बांधकाम विभागालाही केवळ ७ कोटी निधी मिळाला. ज्यामुळे तेथील कंत्राटदारांनाही केवळ ४ ते ५ टके निधी मिळाला. या तुटपुंज्या निधीमुळे कंत्राटरांमध्ये तीव्र नाराजी आहे. शासनाने किमान ५० टके निधी देणे आवश्यक होते. मिळालेल्या ५ टके निधीमुळे ना देणेकर्यांचे पैसे फेडता येतात, ना बँकेचे व्याज, ना मंजूर पुरवठादांची देणी चुकवता येते. त्यामुळे कंत्राटदारांची आर्थिक स्थिती ढासळली असून, घरी देणेकरी, मजूर, सिमेंट व इतर मटेरियल पुरवठादार रोज धडक देत आहे. या आर्थिक संकटामुळे कंत्राटदार आत्महत्येच्या मार्गावर जात आहेत. नागपूर येथील कंत्राटदार पी. व्ही. वर्मा यांनी ४० कोटी रुपयांची देयके न मिळाल्याने आत्महत्या केली. हर्षल पाटील यांनाही प्रलंबित देयकांच्या कारणास्तव आत्महत्या करावी लागली. Wardha News वर्धा येथील एका कंत्राटदाराने १५ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. देयके न मिळाल्याने जिल्ह्यातील हजारो मजूर बेरोजगार झाले असून सुपरवायझर, चालक, अभियंते व इतर सुशिक्षित मजूर आर्थिक संकटात सापडले आहेत.

कामे बंद करून तीव्र आंदोलन
गणेश विसर्जनानंतर सर्व चालू विकासकामे बंद करून तीव्र आंदालन करण्यात येईल, असा इशाराही कंत्राटदार संघटनेने दिला आहे. यावेळी किशोर मिटकरी, अजय घवघवे, प्रमोद चव्हाण, संदीप डेहने, अरविंद कोकाटे, विशाल शेडे, विशाल वाट, अशोक चंदनखेडे, बाळू शिंदे, हर्षल मांडमवार, रणजित मोडक, राजेश हाडोळे, संजय नंदनवार, पिंटू सातपुते, सुनील शेरजे, अजय पाल, यादव महाराज, रमेश भगत, सारंग चोरे, युवराज शिंदे आदी उपस्थित होते.

