
अहेरी (पेरमिली) :- अहेरी तालुक्यातील
प्राथमिक आरोग्य केंद्र पेरमिली अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र पेरमिलीच्या वतीने आज, १० ऑगस्ट २०२६ रोजी ‘अस्थिव्यंग अपंग निवासी शाळा, पेरमिली’ येथे जागतिक डेंगू प्रतिरोधक दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. कार्यक्रमादरम्यान हिवताप (मलेरिया), डेंग्यू तसेच विविध जलजन्य आजारांची कारणे, लक्षणे आणि त्यापासून बचावाचे उपाय याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत, उपस्थित सर्व शाळातील मुले आणि मुलींची प्रतिबंधात्मक हिवताप तपासणी (Blood Screening) देखील यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती निर्माण झाली असून, शाळा व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागाच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
यावेळी आरोग्य सेवक मयुर कोडापे ,शिक्षकवृंद,कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

