
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
मुल ( बोरचांदली) :-
बोरचांदली ग्रामपंचायत चे गावातील समस्येकडे दुर्लक्ष.

“एकीकडे स्वच्छता अभियान” दुसरीकडे त्याची अंमलबजावणी नाही.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील मुख्य चामोर्शी रस्त्यावर असलेले बोरचंदली गाव हे विकासापासून दूर आहे,त्यात ग्रामपंचायत असून गावकऱ्यांचे समस्या सुटता सुटेना, ग्रामपंचायत च्या भोंगळ कारभारामुळे गावात घाणीच्या साम्राज्यामुळे आरोग्याची समस्या वाढत आहे.
गावातील नागरिकांकडून आरोग्य कर वसूल करण्यात येते. त्यामुळे ग्रामपंचायतीने नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन गावातील साफसफाई करावी. जेणेकरून ग्रामस्थांचे आरोग्य सांभाळता येईल.
ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या त्रस्त झाल्याचे दिसत आहे. तसेच, ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, मूल तालुक्यात बोरचंदली गावात घाणीचे साम्राज्य पसरल्याची चर्चा सध्या गावात होत आहे,
ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यामुळे अगोदरच नागरिक कोरोनामुळे भयभीत झालेले असताना दुसरीकडे या घाणीमुळे साथीचे आजार पसरण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.त्यात पावसाळ्यात घाण सर्वत्र पसरल्यामुळे डासांचे प्रमाण वाढत असून त्यामुळे डेंगू, मलेरिया सारखे आजार फोफावत आहे,
सद्यस्थितीत गावातील बहुतांश नाल्या कचऱ्यामुळे तुंबल्या आहेत. सार्वजनिक नळ असलेल्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणच्या नाल्यांमध्ये चिखल जमलेला आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीच्या आजारास आमंत्रण मिळत आहे. अनेक भागात रस्त्यावर कचरा टाकल्या दिसून येते. हा कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने तो सर्वत्र पसरत असून, यातून वाहतुकी
सार्वजनिक स्वच्छतागृहाची सोय नाही. त्यामुळे नागरिक, व्यावसायिक, प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याकडेही ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

