
ग्रा. पं. कर्मचाऱ्यांची पालकमंत्री ना. भोयर यांच्या कडे निवेदणाद्वारा मागणी
वर्धा – वर्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचार्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची भेट घेऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विभिन्न समस्ये संदर्भात चर्चा करून निवेदन दिले यावेळी मंत्री महोदयांनी न्यायिक प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या शिष्टमंडळाला दिले.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना जिल्हा शाखेच्या वतीने विविध न्यायिक मागण्यासंदर्भात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल चौधरी, सहसचिव गुणवंता चांदूरकर, कोषाध्यक्ष प्रशांत राहांगलाडे, प्रसिद्धी प्रमुख गणेश कोळसे, अनिल भोगे, संजय पाथरे, दिलीप बहुरूपी, राहुल गोरले, प्रशांत होले, उमेश हिंगे यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
राज्यात २७ हजार ९२० कर्मचारी, ६० हजार कामगार अत्यल्प वेतनावर सेवा देत आहेत. त्यांच्या वेतन संदर्भातील मागण्यासंदर्भात विविध आंदोलन करण्यात आली. परंतु, मागण्या मान्य झाल्या नाहीत. सदर मागण्यांमध्ये ग्रापं कर्मचार्यांना नगरपालिका व जिप कर्मचार्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करणे, निवृत्ती वेतन लागू करणे, कर्मचार्यांना उपदान लागू करणे, भविष्यनिर्वाह निधीची रकम कामगार भविष्य निर्वाह निधी संघटन कार्यालयात जमा करण्यात यावी, ग्रापं कर्मचार्यांना सुधारित किमान वेतन लागू करणे तसेच वेतनसाठी लादलेली वसुलीची रकम रद्द करावी, ग्रापं कर्मचार्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करण्यात यावी, जिपप्रमाणे कर्मचार्यांच्या रित पदाच्या १० टयाप्रमाणे वर्ग ३ व ४ चे पदावर नियुती करण्यात यावी, आदी मागण्याबाबत संघटनेने ना. भोयर यांच्याशी चर्चा केली.

कर्मचार्यांच्या न्यायिक मागण्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न करून त्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल्, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. भोयर यांनी शिष्टमंडळाला दिले.

