
चामोर्शी|प्रतिनिधी
भेंडाळा: केवळ रामजी हरडे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण विकास योजनेअंतर्गत ग्रामपंचायत भेंडाळा येथे महाराष्ट्र कृषी दिन उत्साहात साजरा केला.
महाराष्ट्रात दरवर्षी १ जुलै रोजी ‘कृषी दिन’ साजरा केला जातो. हा दिवस राज्यातील शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाला आणि कृषी क्षेत्रातील त्यांच्या मोलाच्या योगदानाला समर्पित आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात हरित क्रांतीला चालना मिळाली आणि शेती उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान आणि आधुनिक शेतीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो.

यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थितांना कृषी दिनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणही करण्यात आले.
हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश सुरजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जय मोहुर्ले, वैभव कापगते, श्रेयस पिपरे, अमर रॉय, प्रणय घेर आणि गोपेश कुंडू यांनी विशेष परिश्रम घेतले.

