
राजमहालात भक्तिमय वातावरण; स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत साधला मनमोकळा संवाद.
अमोल मारकवार | तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी:- गणेशोत्सवानिमित्त अहेरीच्या राजमहालासमोरील पटांगणात विराजमान असलेल्या अहेरीचा राजा गणरायाच्या दर्शनासाठी भाजपचे गडचिरोली मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी गणरायाची विधिवत पूजा-अर्चना करून आशीर्वाद घेतला.

दरम्यान, दर्शनानंतर आमदार डॉ. नरोटे यांनी स्थानिक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत काही वेळ घालवत अगदी अनौपचारिक आणि दिलखुलास वातावरणात संवाद साधला. कार्यकर्त्यांशी विविध स्थानिक विषयांवर चर्चा करत त्यांनी त्यांचे म्हणणे जाणून घेतले.
राजमहाल परिसरातील आकर्षक गणेश सजावट, गणरायाची भव्य मूर्ती आणि भक्तिमय वातावरण यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. आमदारांच्या भेटीवेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
अहेरीचा राजाच्या चरणी भक्तिभाव, कार्यकर्त्यांसोबत मनमोकळा संवाद आणि राजमहालात गणेशोत्सवाचा उत्साह, अशा वातावरणात आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची अहेरी भेट चर्चेचा विषय ठरली.

