
जिल्हा प्रतिनिधी| गडचिरोली
चामोर्शी : गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात आ. डॉ. मिलिंद नरोटे यांनी चामोर्शी येथील भाजपा तालुकाध्यक्षा रोशनी स्वप्निल वरघंटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी आ. डॉ. मिलिंद नरोटे यांनी वरघंटे कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण संवाद साधत त्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच श्री गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्त उपस्थित होते.
गणरायाच्या दर्शनाने आणि भक्तिमय वातावरणातील या स्नेहभेटीने गणेशोत्सवाचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला.

