
एटापल्ली : मौजा कारका खुर्द येथील रहिवासी तथा लंकेश गोटामी यांचे वडील श्री. अडवे नेवरू गोटामी यांचे कर्करोगाच्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव अजय कंकडालवार यांनी गोटामी परिवाराची भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच दुःखाच्या प्रसंगी कुटुंबाला आधार मिळावा या उद्देशाने १० हजार रुपयांची आर्थिक मदत केली.
अडवे नेवरू गोटामी यांच्या निधनामुळे कारका खुर्द परिसरात शोककळा पसरली आहे. दीर्घकाळापासून कर्करोगाशी झुंज देत असलेल्या गोटामी यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या कठीण प्रसंगी अजय कंकडालवार यांनी गोटामी कुटुंबाला धीर दिला. दुःखात सहभागी होत कुटुंबीयांना शक्य ती मदत करण्याचा विश्वासही त्यांनी कार्यकर्त्या मार्फत व्यक्त केला.
यावेळी तालुका काँग्रेस नेते प्रज्वल नागूलवार, आदिवासी काँग्रेस अध्यक्ष सुधाकर गोटा, जवेलीचे उपसरपंच दामजी हिचामी, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सचिव स्वप्नील कन्नलवार, दिनेश वड्डे, जवेलीच्या सरपंच अलिशा गोटा, दुलसा गावडे पाटील, कान्हालगावचे पाटील मणिराम नरोटे, पेंदुळवाहीचे पाटील बंडू हिचामी, कोहका उपसरपंच अंतू नरोटे, नेवरा मटामी, राकेश नरोटे पाटील रोपी, अण्णा गावडे, नेवसू नरोटे, नरेश गावडे, मंकू गोटामी, गोटामी सर, बंडू गोटामी, विठ्ठल गोटामी, मुरलीधर सावकार कुंभमवार, रमेश गोटामी यांच्यासह समस्त गावकरी उपस्थित होते.

यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहून गोटामी परिवाराच्या दुःखात सहभागी झाले. उपस्थितांनी दिवंगत अडवे नेवरू गोटामी यांना श्रद्धांजली अर्पण करून शोकाकुल कुटुंबीयांना धीर दिला.

