
सोनू वाळके,जिल्हाप्रतिनिधी, गडचिरोली.
भेंडाळा :-
चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभागा तर्फे संपूर्ण गावांत तसेच घराघरांत जंतुनाशक औषधांची फॉंगिन्ग मशीनद्वारे धूर फवारणी करण्यात आली.पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने चामोर्शी तालुक्यातील अनेक गावांमध्ये साथीचे रोग पसरले आहॆ नागरिकांमध्ये आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजीने भीती पसरली आहॆ. याकरिता भेंडाळा गावांमध्ये युध्दपातळीवर ग्रामपंचायत व आरोग्यविभागाच्या माध्यमातून जंतुनाशक धूर फवारणी फॉंगिन्ग मशीनद्वारे करण्यात येत आहॆ. गावांमध्ये साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी भेंडाळा ग्रामपंचायत च्या युवा सरपंचा सौ कुंदा जुवारे यांनी कंबर कसली आहॆ. तसेच ग्रामपंचायत सदस्य , कर्मचारी , ग्रामसेवक व आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्या सहकार्याने फॉंगिन्ग मशीन च्या माध्यमातून धुरळनी रात्रौ च्या वेळेस करण्यात येत आहॆ.
तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये धूर फवारणी ची आवश्यकता.भेंडाळा परिसरातील ग्रामपंचायती अद्याप ही यापासून दूर.
पावसाळ्यामध्ये गावागावांत साथीच्या रोगाचे थैमान असते त्यामुळे या साथ रोगाविरुध्द गावागावांत वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक असते
तसेच गावातील स्थानिक प्रशासन व आरोग्य विभाग यांनी मिळून संपूर्ण गावांमध्ये व घराघरांमध्ये जाऊन धूर फवारणी करणे गरजेचे आहॆ त्यामुळे आपण डासांपासून दूर राहू शकतो. शासनाने या सर्व बाबींचे नियोजन स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाकडे सोपविले आहॆ पण यांची प्रभावी अंमलबजावणी होतांना दिसत नाही. त्यामुळे शासनाच्या नियोजनाची पायमल्ली स्थानिक प्रशासन व आरोग्य विभाग करीत आहॆ का असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण होतं आहॆ.

