
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,दि. १६ ऑगस्ट:महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तसेच वर्धा व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. पंकजजी भोयर यांचे गडचिरोली येथे आगमन झाले. याप्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अत्यंत उत्साहात स्वागत केले. स्वागतप्रसंगी डॉ. नेते यांनी राज्यमंत्र्यांशी विविध विषयांवर सलोख्याचे हितगुज केले.
या प्रसंगी माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, जिल्हा अध्यक्ष रमेश बारसागडे, नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे,शहराध्यक्ष तथा न.प.सभापती अनिल कुनघाडकर,नगरसेवक सागर निंबोरकर, यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


