
प्रतिनिधी/रुपेश सलामे
गडचिरोली :-
गडचिरोली शहरातील कारगिल स्मारक, कारगिल चौक येथे कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ व कारगिल स्मारक समितीच्या वतीने भारताचा ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात कारगील स्मारकचे संस्थापक तथा ज्येष्ठ पत्रकार उदय धकाते यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताने वातावरण भारावून गेले.

कार्यक्रमाला श्री गुरुदेव उच्च प्राथमिक शाळा, नगर परिषद राजीव गांधी प्राथमिक शाळा तसेच विद्याभारती कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली येथील शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रध्वजला मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सामूहिक नृत्य तसेच प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षक तुषार निकुरे व सौ. मीरा मडावी यांनी केले.
यावेळी मंडळाचे सचिव प्रकाश भांडेकर, उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन,प्रकाश धकाते,मार्गदर्शक सुनील देशमुख, डॉ. नरेश बिडकर, अॅड. विनीत लोखंडे, संजय गद्देवार,जि. के. बारसिंगे,मोबीन सय्यद,अजय पवार,सुचिता धकाते, नीलिमा देशमुख, वनिता भांडेकर, लक्ष्मी हजारे- कोसरे,प्रमिला कुंभारे,विजय लाकडे,संगीता धकाते,महेंद्र मसराम, रुपेश सलामे, बाळू मोटघरे, रामा हजारे, महादेव कांबळे,गजानन भारसागडे,आदित्य चिचघरे,अविनाश शेंडे, गणेश मेश्राम,यांच्यासह शहरातील गणमान्य नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासह चोख बंदोबस्त ठेवत कार्यक्रमासाठी उत्तम सहकार्य केले. त्यांच्या सहकार्याबद्दल आयोजकांनी आभार व्यक्त केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कारगिल स्मारकाच्या साक्षीने साजऱ्या झालेल्या या स्वातंत्र्य दिन सोहळ्यामुळे परिसरात देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले.

