
कोरची प्रतीनीधी श्याम यादव
कोरची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत (मनरेगा ) कार्यरत असलेल्या ग्राम रोजगार सेवकांनी मंगळवार 2६ आगस्टपासुन बेमुदत काम बंद आदोंलन सुरू केले आहे मार्च 20२५ पासुनचे मानधन थकल्यामुळे हे आंदोलन पुकारले आहे या बाबत २० आगस्ट रोजी मुख्य कार्यकारी ग्राम रोजगार संघटना पत्र देवुन ग्राम रोजगार सेवकांचा बेमुदत संपाचा इशारा ईशारा दिला आहे. #newsjagar

ग्राम रोजगार निवेदनात म्हटले आहे की, ग्रामरोजगार सेवक तटपुज्या मानधनावर काम करीत आहे त्यात गेल्या अनेकमहिन्या पासुन मानधन मिळाले नाही मार्च2०२५ पासून मानधन अध्यापही प्रलंबित असल्याने त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह प्रश्न निर्माण झाला त्यांचावर उपासमाळी वेळ आली आहे त्यामुळे ग्रामरोजगार सेवकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने ग्रामरोजगार सेवकांनी जोपर्यंत त्याचे सर्व प्रलंबित मानधन अदा केले जात नाही तोपर्यंत रोजगार हमी योजनेचा कोणतेच कामे करणार नाही असा निर्धार ग्रामरोजगार सैवकांनी व्यक्त केला आहे सदर निवेदन गट विकास अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आला आहे त्यावेळी तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते.

#korchi #कोरची

