
मुल / न्यूज जागर जिल्हा प्रतिनिधी..
“सरकारी मालमत्तेची विटंबना खपवून घेतली जाणार नाही; दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल ” – नगराध्यक्षा सौ. एकता प्रशांत समर्थ.
मुल नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावरील शासकीय शिलान्यासावर शेण फेकल्याच्या घटनेबाबत नगराध्यक्षा सौ. एकता प्रशांत समर्थ यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. या घटनेचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न न करता, दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई नक्कीच झाली पाहिजे ,

नगराध्यक्षा सौ. एकता प्रशांत समर्थ म्हणाल्या, “मुल शहर स्वच्छ, सुंदर आणि विकसित करण्यासाठी नगर परिषद सातत्याने प्रयत्न करत आहे. अशा वेळी सरकारी शिलान्यासावर शेण फेकून सार्वजनिक मालमत्तेची विटंबना करणे हा निषेधाचा मार्ग नाही. हा सरकारी संपत्तीचा अपमान आहे आणि अशा प्रकाराला कोणतेही समर्थन देता येणार नाही. प्रशासना मार्फत तातडीने चौकशी करून दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल .”
त्या पुढे म्हणाल्या, “स्वच्छतेसारख्या महत्त्वाच्या विषयावर राजकारण करण्याऐवजी सर्वांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. नागरिकांनीही अफवा किंवा अपप्रचारावर विश्वास न ठेवता सत्य समोर येण्याची प्रतीक्षा करावी.”
यासंदर्भात प्रशांत विलासराव समर्थ म्हणाले, “जाणीवपूर्वक अशा घटना घडवून नगर परिषदेची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होत असेल, तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. दोषी कोणताही असो, त्याला कोणतेही राजकीय संरक्षण मिळता कामा नये. पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करावा आणि सत्य जनतेसमोर आणावे.”
ते पुढे म्हणाले, “नगर परिषद शहराच्या विकासासाठी आणि स्वच्छतेसाठी सातत्याने काम करत आहे. काहीजण राजकीय प्रसिद्धीसाठी किंवा वातावरण गढूळ करण्यासाठी अशा घटना घडवत असतील, तर नागरिकांनी त्याला बळी पडू नये. सत्य आणि पुराव्यावरच विश्वास ठेवावा.”
दरम्यान, नगराध्यक्षा यांनी संबंधित ठिकाणाची तातडीने स्वच्छता करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून सरकारी मालमत्तेची विटंबना करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल .
मुल नगर परिषद परिसरातील शिलान्यास फलकावर शेणफेक करून सार्वजनिक मालमत्तेचा अवमान करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारच्या कृत्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. नगर परिषदेच्या सार्वजनिक मालमत्तेची विटंबना करणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका नगराध्यक्षा सौ. एकता प्रशांत समर्थ यांनी व्यक्त केली. Sau ekta samrth.

